शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज सिंह चौहान हे तर कंस मामा, अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:47 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी  अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी  अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम आदमी पक्षाने भोपाळमध्ये आयोजित केलेल्या शंखनाद रॅलीमध्ये केजरीवाल यांनी हा घणाघात केला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व 230 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणाही केजरीवाल यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले,"सुमारे 15 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान यांची सत्ता आहे. एखाद्या सरकारसाठी 15 वर्षे खूप असतात. पण या 15 वर्षांत शिवराज सिंह चौहान यांनी कुठले एक चांगले काम केले असेल तर सांगा. मध्य प्रदेशात शिक्षक सुखी आहेत का, विद्यार्थी खूश आहेत का, महिला, शेतकरी, आदिवासी, व्यापासी सुखी आहेत का. मध्य प्रदेशमधील सर्वसामान्य जनता दु:खी आहे." केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्लीची अवस्थासुद्धा अशीच होती. 15 वर्षे शीला दीक्षित यांचे सरकार होते. लोक दु:खी होते. मग अण्णांचे आंदोलन झाले. त्या आंदोलनातून आपचा जन्म झाला. "काँग्रेस-भाजपाची जुगलबंदी तोडण्याचे दिल्लीकरांनी निश्चित केले आणि एका नव्या राजकारणाचा जन्म झाला. आज दिल्लीची जनता सुखी आहे." गेल्या दीड वर्षांत दिल्लीमध्ये जेवढी विकासकामे झाली आहेत तेवढी गेल्या 70 वर्षांत कुठल्याही शहरात झालेली नाहीत, असा दावाही केजरीवाल यांनी केला.  मध्य प्रदेशची चर्चा सुरु झाल्यावर सर्वप्रथम डोक्यात व्यापम घोटाळा येतो, असा टोलाही केजरीवाल यांनी हाणला."शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील 8 कोटी जनतेचा अपमान केला आहे.  व्यापम घोटाळ्यात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. भ्रष्टाचार लपवण्यासाठी तरुण-तरुणींची हत्या केली गेली. मध्य प्रदेश संपूर्ण जगात भ्रष्टाचारासाठी ओळखला जातो. तर दिल्लीमधील आपच्या सरकारचे उदाहरण प्रामाणिक सरकार म्हणून दिले जाते. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिजिंलेंस कमिशनने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाच्या केंद्र सरकारमध्ये 67 टक्के भ्रष्टाचार वाढल्याचे तर दिल्लीच्या आप सरकारमध्ये 81 टक्के भ्रष्टाचार कमी झाल्याचा उल्लेख आहे."असेही केजरीवाल यांनी सांगितले.   

टॅग्स :AAPआपBJPभाजपा