बाजारवाडीचे शिवकालीन मंदिर

By Admin | Updated: December 20, 2015 23:59 IST2015-12-20T23:59:48+5:302015-12-20T23:59:48+5:30

नेरे : भोरपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी (ता. भोर) येथे शिवकालीन दगडात कोरीव कामात महादेवाचे पुरातन मंदिर असून ते महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षण ठरत आहे.

Shivnar Mandir of Barkwadi | बाजारवाडीचे शिवकालीन मंदिर

बाजारवाडीचे शिवकालीन मंदिर

रे : भोरपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी (ता. भोर) येथे शिवकालीन दगडात कोरीव कामात महादेवाचे पुरातन मंदिर असून ते महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षण ठरत आहे.
भोर तालुक्याच्या दक्षिणेस असणार्‍या रोहिडागडाच्या पायथ्याशी हे शिवकालीन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम दगडी चिर्‍यांमध्ये चुनखडी व माती यामध्ये इसवी सन १८६४ मध्ये केलेले असल्याचे याच मंदिरावरील एका दगडी चिर्‍यावरील तारखेवरून बाजारवाडी गावातील अनेक जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. शिवकालीन मंदिराचे बांधकाम माती, चुनखडी व दगडी चिर्‍यांमध्ये केलेले असले, तरी ते जीर्ण अवस्थेत होते. ३० वर्षांपूर्वी बाजारवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिरावर उगवलेली झाडे, फुलझाडे, माती याची साफसफाई करून दगडी कोरीव बांधकामात सिमेंट वापरून दर्जा भरून जीणार्ेद्धार करण्यात आले. या मंदिराचे दगडी खांब, दगडी दरवाजा, दगडामधील कोरीव काम, मंदिरातील गणेशाची दगडी मूर्ती व महादेवाची पिंड महाराष्ट्रातील पर्यटकांना मोठे आकर्षण ठरत असल्याचे गावातील जाणकार मंडळींकडून सांगण्यात आले.
रोहिडा किल्ल्याकडे जाताना हे महादेवाचे पुरातन मंदिर पर्यटकांना खुणावत असले, तरी पुरातन विभागाने याकडे लक्ष दिल्यास पर्यटकांच्या दृष्टीने ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते, असे ग्रामस्थ, पर्यटक यांच्याकडून सूचित करण्यात येत आहे.
फोटो - बाजारवाडी (ता. भोर) येथील पुरातन काळातील दगडी चिर्‍यांमधील महादेवाचे मंदिर.

Web Title: Shivnar Mandir of Barkwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.