शिवाजीराजे क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ अडीच लाखांची बक्षिसे; उपांत्य व अंतिम सामने प्रकाशझोतात

By Admin | Updated: February 1, 2017 00:31 IST2017-01-31T02:05:19+5:302017-02-01T00:31:32+5:30

कसबा बावडा : छत्रपती शिवाजीराजे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व उपमहापौर अर्जुन माने, ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

ShivajiRaje's cricket prize starts 2.5 lakhs; The semi-finals and the last matches light up | शिवाजीराजे क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ अडीच लाखांची बक्षिसे; उपांत्य व अंतिम सामने प्रकाशझोतात

शिवाजीराजे क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ अडीच लाखांची बक्षिसे; उपांत्य व अंतिम सामने प्रकाशझोतात

कसबा बावडा : छत्रपती शिवाजीराजे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व उपमहापौर अर्जुन माने, ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
दहा दिवस चालणार्‍या या स्पर्धेचे उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना प्रकाशझोतात खेळविले जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष असून, पॅव्हेलियन मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख एक लाख व चषक, तर उपविजेत्या संघास रोख ७१ हजार व चषक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय इतर वैयक्तिक बक्षिसेही मोठ्या प्रमाणावर देण्यात येणार आहेत.
दरम्यान, रविवारी खेळविल्या गेलेल्या सामन्यात सकाळच्या सत्रात मॉर्निंग स्पोर्टस्ने संयुक्त धनगर गल्ली स्पोर्टस्वर विजय मिळवला, तर दुसर्‍या सामन्यात एम.सी.सी. स्पोर्टस्ने एम.सी.जी. संघावर मात केली. दुपारच्या सत्रातील सामन्यात सनी फायटर्स स्पोर्टस् या संघाने साई स्पोर्टस्वर विजय मिळविला. चौथ्या सामन्यात गुरू स्पोर्टस्ने भैरवनाथ स्पोर्टस्वर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक मोहन सालपे, प्र्रवीण केसरकर, अशोक जाधव, माधुरी लाड, प्रवीण उलपे, दत्ता पाटील, इंद्रजित कारंडे, अमिर मुल्लाणी तसेच संयोजन समितीचे रोहन पाटील, निरंजन पाटील, रणजित पाटील, अभिजित पाटील, अनिकेत बेडेकर, अजिंक्य पाटील, अतुल रणदिवे, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.
----------
फोटो, लोगो
---------

 

Web Title: ShivajiRaje's cricket prize starts 2.5 lakhs; The semi-finals and the last matches light up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.