शिवाजीनगर पुलाचा प्रस्ताव प्रशासनाकडे मनपाचे नाहरकत: बजरंग बोगद्यास समांतर भूमिगत मार्गासाठीही मागितली मदत
By Admin | Updated: August 7, 2016 00:42 IST2016-08-07T00:42:00+5:302016-08-07T00:42:00+5:30
जळगाव : शिवाजीनगर पूल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्याचा प्रस्ताव व त्या संदर्भातील ना हरकत महापालिकेकडून शनिवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. बजरंग पूलास समांतर दोन भूमिगत रस्त्यांसाठीही मदत मिळावी असे या प्रस्तावात म्हटले आहे.

शिवाजीनगर पुलाचा प्रस्ताव प्रशासनाकडे मनपाचे नाहरकत: बजरंग बोगद्यास समांतर भूमिगत मार्गासाठीही मागितली मदत
ज गाव : शिवाजीनगर पूल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्याचा प्रस्ताव व त्या संदर्भातील ना हरकत महापालिकेकडून शनिवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. बजरंग पूलास समांतर दोन भूमिगत रस्त्यांसाठीही मदत मिळावी असे या प्रस्तावात म्हटले आहे. शहरातून जाणार्या रेल्वे मार्गामुळे तीन विभाग या शहराचा तीन भाग पडले आहेत. शिवाजीनगर गेंदालाल मिल परिसर, दाळफळ परिसर हा रेल्वे मार्गाच्या उत्तरेकडील भाग, पिंप्राळा परिसर, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भोईटे नगर, निमखेडी परिसर हा अतिशय मोठा परिसर रेल्वे मार्गाच्या पलिकडे असलेला भाग आहे. शहराची जवळपास १५ ते २० टक्के जनता या भागात रहाते. उर्वरित भागात शहराचा इतर भाग येतो. शहराचा विभागणीचा विचार करता पहिल्या भागात १५ टक्के, दुसर्या भागात २० तर तिसर्या भागात ६५ टक्के जनता रहाते. शहरात दळणवळण करणारी बरीच वाहतूक पिंप्राळा रेल्वे गेटकडून शिवाजी नगर पुलाकडे येतेे. भूमिगत रस्त्याचा प्रस्तावपिंप्राळा प्रेमनगर व इतर उपनगरांकडून येणारे बरेचसे नागरिक पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या बजरंग बोगद्यामार्गे येत असतात. येथेही बर्याच वेळेस वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या रस्त्याला समांतर पिंप्राळा रेल्वे गेटनेच्या दिशेने दोन ठिकाणी भूमिगत रस्त्यांचे प्रस्ताव महापालिकेने केले आहेत. त्यासाठी महापालिकेस ४ कोटींचा खर्च येणार आहे.