शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

शिवरायांनी कधीही महिलांना लक्ष्य केलं नाही, सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 08:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटवरुनही औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला

ठळक मुद्देशिवाजी महाराज हे अन्यायाविरुद्ध लढले. शिवरायांनी आपल्या लढाईत कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उत्कृष्ट संसदपटू खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. ईडी आणि सीबीआय या संस्थांकडून राज्यातील नेत्यांवर, त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या कारवाईचा उल्लेख करत लोकसभेत आवाज उठवला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख करत, केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटवरुनही औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला. सुप्रिया सुळेंनी त्याचाच संदर्भ देत लोकसभेतील पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान भाजपवर टिकास्त्र सोडले. शिवाजी महाराज हे अन्यायाविरुद्ध लढले. शिवरायांनी आपल्या लढाईत कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत. एकीकडे पंतप्रधान शिवाजी महाराजांचा दाखला देतात, आणि दुसरीकडे ईडी-सीबीआयच्या माध्यमातून कुटुंबांना लक्ष्य केलं जात असल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं.  छत्रपती शिवरायांनी नेहमीच महिला, मुलांचे संरक्षण केले. मात्र, ईडी, सीबीआयच्या छाप्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी श्रीमती खडसे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कुटुंबीय यांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेखही आपल्या भाषणात केला. दरम्यान, 100 कोटींच्या वसुलीप्रकरणात सध्या अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. 

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी

भारतात अनेक सल्तनती आल्या आणि गेल्या. अनेक आक्रमक आले आणि गेले. मात्र, पवित्र काशी या सर्वांना पुरून उरली. या शहराचे महात्म्य आजही कायम आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला. तसेच, आक्रमकांनी काशीवर अनेक आक्रमणे केली. शहराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धर्मवेडाने झपाटलेल्या औरंगजेबाने तलवारीच्या धाकावर येथील संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती जगावेगळी आहे. येथे औरंगजेब आला तर त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराज या भूमीत जन्मतात, असे म्हणत छत्रपतींचा गौरवशाली इतिहास मोदींनी सांगितला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSupriya Suleसुप्रिया सुळेAnil Deshmukhअनिल देशमुख