शिवाजी महाराज जयंती... जोड
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:08+5:302015-02-20T01:10:08+5:30
तारसा

शिवाजी महाराज जयंती... जोड
त रसास्थानिक ग्रामपंचात कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच शेषराव देशमुख होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी शिवाजी नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य लता गिरडकर, राजेंद्रकुमारी गोट्टीपाट्टी, मंजुषा राऊत, सविता हटवार, नरेंद्र देशमुख, मोतीराम सोमनाथे, चंद्रशेखर गभने, शेखर डांगरे, नरेंद्र देशमुख, रवी वैरागडे, शुभम गिरडकर, ओमकार महादुले, गोलू बांते, मंगेश धांडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसंगी मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक मंजुषा राऊत यांनी तर आभार सविता हटवार यांनी मानले. मौदास्थानिक शिवाजी प्राथमिक शाळेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी घोडेस्वार शिवाजी महाराज, राजमाता जिजामाता यांची वेशभूषा साकारली होती. रंगबेरंगी पताका घेतलेल्या मावळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. ढोल-ताशांच्या निनादात विविध कवायतींच्या प्रदर्शन व जय भवानी-जय शिवाजींचा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. बसस्थानक परिसरातील तुकडोजी पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी तुकडोजी महाराजांचा पुतळा व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुशाल शिंगणजुडे होते. यावेळी शिवराज गुजर, पृथ्वीराज गुजर, विलास धनजोडे, शिवशंकर सावनेरकर, ज्ञानेश्वर कुहीकर, कल्पना मानकर, रामप्रसाद पराते, रामगोपाल डागा, तुळशीराम काळमेघ, अनिल बोरकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्ञानेश्वर वानखेडे, विश्वंभर तिवारी, नाना इंगळे, अशोक धनजोडे, भास्कर चित्रीव, यशवंत पराते, किशोर धकाते, आनंद माथनीकर, प्रताप सरनाईक, सुरेश फुलबांधे, शंकर पराते, मेघराज निनावे, बाबुराव निनावे, रमेश फुलबांधे, उज्ज्वला हटवार, पद्माकर वासनिक, जयदेव आंबिलडुके, उज्ज्वला सावरकर, अजय वैद्य आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधींकडून)