शिवाजी महाराज जयंती १
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:41+5:302015-02-20T01:10:41+5:30
रंगारवाडा शाळा

शिवाजी महाराज जयंती १
र गारवाडा शाळानाशिक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जुने नाशिक परिसरातील शाळा क्र. ३५, रंगारवाडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक छाया माळी यांच्या हस्ते शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अंकुश राऊत, शिरीष पाडवी हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजामाता, मावळे यांच्या वेशभूषेसह विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. इयत्ता सातवी च्या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण केले. एकच ध्यास करू अभ्यास अभियान या उपक्रमाअंतर्गत परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी शाळेत ज्ञानमंजूषा स्पर्धा शिवाजी महाराजंाच्या चारित्र्यावर घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती धूम, सुरेखा पवार यांनी केले.नूतन मराठी प्राथमिक शाळानाशिक : येथील क्रां. वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्याध्यापक कल्पना धात्रक यांनी पूजन केले. प्रदीप थापा, ऐश्वर्या धूम, ऋतुजा शिकारे, हर्षाली ठाकरे, शिवानी पवार, सिद्धेश इंचाळे, प्रज्ञा तुपसौंदर, कृष्णा जोशी, आकाश पवार, विश्वजित भालेराव यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. योगीता गायकवाड, केशव शेलार यांनी जिजाऊ व महाराजांची वेशभूषा केली.इयत्ता चौथीच्या १५ विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनपट सादर केला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. कल्पना कुवर यांनी मुलांना शिवाजी महाराजांचा जीवनपटावर माहिती सांगितली. सीमा ताडगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.