शिवाजी जयंती
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:34+5:302015-02-20T01:10:34+5:30
नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

शिवाजी जयंती
न गपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम शिवाजी पुतळा, गांधीगेट, महाल येथे साजरा करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी आमदार यादवराव देवगडे, उपाध्यक्ष राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, कमलेश समर्थ, तुफैल अशर, विजय बाभरे, अतुल कोटेचा, रत्नाकर जयपूरकर, दिलीप ठाणेकर आदी उपस्थित होते. यावेळी विजयी घोषणा देण्यात आल्या. ठाकरे व मुत्तेमवार यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधी गेट, महाल येथील अश्वारूढ प्रतिमेला शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी महाराजांचा जयघोष केला. कार्यक्रमाला महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, बंडू राऊत, विलास त्रिवेदी, डॉ. कल्पना पांडे, संध्या समर्थ, सुधीर हिरडे, उषा पॅलट, रश्मी फडणवीस, जितू ठाकूर, मनीष मेश्राम व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.