शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

Dadra Nagar Haveli By-Election: योगायोग! बाळासाहेबांनाही 1998 मध्ये जमले नव्हते; राज्याबाहेर प्रथमच सेनेचा भाजपाला 'हादरा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 06:59 IST

Dadra Nagar Haveli By-Election result: दादरा-नगर हवेलीत कलाबेन डेलकर विजयी; भाजपला धक्का. भाजपने गुजरात आणि महाराष्ट्रातील त्यांच्या वजनदार नेत्यांना प्रचारात उतरविले. पण डेलकर कुटुंबाप्रति असलेल्या सहानुभूतीच्या लाटेने भाजपचा धुव्वा उडविला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  लोकसभा पोटनिवडणुकीत दादरा नगर हवेलीची जागा जिंकून शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर इतिहास घडवला. आतापर्यंत शिवसेनेचा एकही उमेदवार अन्य राज्यांतून लोकसभेवर निवडून गेला नव्हता. तेथील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्याने ही जागा रिक्त होती. त्यांच्या पत्नी कलाबेन यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि निवडणूक स्वबळावर लढली. डेलकर यांनी भाजपचे महेश गावित यांचा ५१,२६९ मतांनी पराभव केला. 

यापूर्वी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, बिहारपासून विविध राज्यांमध्ये कधी लोकसभा तर कधी विधानसभा निवडणूक लढून महाराष्ट्राबाहेर कक्षा विस्तारण्याचे प्रयत्न शिवसेनेने करून बघितले पण त्यात कधीही यश आले नव्हते. पण कलाबेन डेलकर यांच्या निमित्ताने शिवसेनेला राज्याबाहेर लोकसभेचे प्रतिनिधीत्व मिळाले. शिवसेनेचे महाराष्ट्रात १८ खासदार असून डेलकर यांच्या विजयाने ही संख्या आता १९ झाली आहे. 

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते  आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कलाबेन यांचे पती आणि दीर्घकाळ  खासदार राहिलेले मोहन डेलकर यांच्याशी राऊत यांचे कौटुंबिक संबंध होते. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर काही गंभीर आरोप केले होते. कलाबेन डेलकर यांना असलेल्या सहानुभूतीने  शिवसेनेचे काम सोपे केले.

असे म्हटले जाते, की कलाबेन यांनी भाजपकडून लढावे किंवा अपक्ष लढावे मात्र कोणत्याही पक्षाकडून लढू नये, असा त्यांच्यावर दबाव होता. तो झुगारून त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रचाराच्या नियोजनावर तर लक्ष ठेवून होतेच शिवाय त्यांनी तिथे सभाही घेतल्या. स्वत: आदित्य यांनी निकालानंतर ट्विट करून, खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई आणि कलाबेन यांचे पुत्र अभिनव डेलकर व शिवसैनिकांचे या विजयासाठी विशेष कौतुक केले आहे. 

भाजपने गुजरात आणि महाराष्ट्रातील त्यांच्या वजनदार नेत्यांना प्रचारात उतरविले. त्यात देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, अश्विनी वैष्णण, डॉ. भारती पवार यांचा समावेश होता, पण डेलकर कुटुंबाप्रति असलेल्या सहानुभूतीच्या लाटेने भाजपचा धुव्वा उडविला.

राजकारणात नवीनकलाबेन राजकारणात नवीन आहेत. त्यांचे पती मोहनभाई सात वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मोहनभाई यांचे वडीलही सांझीभाई हेही १९६७ साली याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते. मोहनभाईंनी अपक्ष, भाजप व काँग्रेसतर्फे निवडणुका लढवल्या. 

असाही योगायोगयापूर्वी १९९८ मध्ये शिवसेनेने दादरा नगर हवेलीत लोकसभा निवडणूक लढविली होती व प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती तरीही शिवसेनेचा दारुण पराभव झाला. तेव्हा मोहन डेलकर निवडून आले होते. 

बरेच वर्ष आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विजयाची प्रतिक्षा करत होतो, ती संधी इथे मिळाली. आमचा पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशाचे चित्र बदललेले असेल. एक पक्षीय सरकारचे दिवस २०२४ मध्ये संपतील आणि पुन्हा एकदा आकड्यांचा खेळ सुरू होईल.- खा संजय राऊत, शिवसेनेचे प्रवक्ते

टॅग्स :dadra-and-nagar-haveli-pcदादरा आणि नगर हवेलीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा