चुरशीच्या लढतीत शिवसेनेची............ जोड

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:13+5:302015-08-23T20:40:13+5:30

मंचर शहरातील समस्या सोडविण्याचे आवाहन नवीन सरपंचांपुढे असणार आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता अस्तित्वात असणारी पाणीपुरवठा योजना जरी नव्याने करण्यात आली असली, तरी आताच पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचा चोहोबाजूंनी विस्तार वाढतो. शिवाय दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे.

Shiv Sena's ............ match in Churshi | चुरशीच्या लढतीत शिवसेनेची............ जोड

चुरशीच्या लढतीत शिवसेनेची............ जोड

चर शहरातील समस्या सोडविण्याचे आवाहन नवीन सरपंचांपुढे असणार आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता अस्तित्वात असणारी पाणीपुरवठा योजना जरी नव्याने करण्यात आली असली, तरी आताच पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचा चोहोबाजूंनी विस्तार वाढतो. शिवाय दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आणावी लागेल. पुढील पंचवीस वर्षांत शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता तसे नियोजन करावे लागेल. राजकीय नेतृत्वाने त्याची दखल यापूर्वीच घेतलेली दिसते. मात्र आता नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच अस्तित्वात येण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
बसस्थानकावर एक सुलभ शौचालय व शहरातील मोजक्या ठिकाणी असणार्‍या मुतार्‍या वगळता स्वच्छतागृहे कोठेच नाहीत. त्यातही महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. शहरात आता सार्वजनिक जागा फारशा राहिलेल्या नाहीत, मात्र तरीही भविष्यात स्वच्छतागृहे उभारावी लागतील. अर्थात ग्रामपंचायत प्रशासनाला निधी देण्यास काही मर्यादा आहेत. कचराप्रश्नही सोडवावा लागेल. शहरातील कचरा उचलून अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मागे असणार्‍या डोंगरावर टाकला जातो. पूर्वी तो शिंदेवाडी गावच्या हद्दीत टाकला जायचा. मात्र ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला. शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने आता हा कचरा अलीकडे टाकला जातो.
भविष्यात या भागात बांधकामक्षेत्र वाढीस लागेल. त्या वेळी कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. नव्याने निवड झालेल्या सरपंच गांजाळे यांना प्रश्न आत्ताच लक्षात घ्यावे लागणार आहेत. शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असताना त्याची नोंद करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नाही. छोट्या वस्त्यांवरील रस्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. शहरातील काही रस्त्यांची कामे झाली. त्या वेळी अतिक्रमणे काढण्यात आली. या व्यावसायिकांची पुनर्वसन करण्याची मागणी आहे. रस्त्याला भरणारा आठवडे बाजार इतरत्र हलविण्याच्या सूचना आहेत. त्यावर उपाययोजना कराव्या लागतील.
लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या स्मारकाचा मुद्दा प्राधान्याने हाती घ्यावा लागेल. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीवर भर दिला पाहिजे. अर्थात गावाचा विकास करताना लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवून जास्तीत जास्त निधी आणावा लागेल. शहराचा विकास आराखडा बनविला तर विकासकामे अधिक गतीने होतील.

Web Title: Shiv Sena's ............ match in Churshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.