शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा 'अर्जुन' शिंदे गटात जाणार?; मनधरणी करण्यासाठी दिल्लीत खलबतं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 11:58 IST

आमची लोकसभा एकच असल्याने दोघांनी एकत्र काम केल्यास राजकीय फायदा होऊ शकतो असं अब्दुल सत्तार म्हणाले.

नवी दिल्ली- जालना येथील शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना शिंदे गटात आणण्यासाठी दिल्लीत खलबतं सुरू आहेत. अब्दुल सत्तार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. मनधरणी करून खोतकरांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर खोतकरांचा शिंदे गटात समावेश अशा बातम्या आल्या त्यावर खोतकरांनी मी शिवसेनेतच असल्याचं सांगितले होते. 

आज नवी दिल्लीत अब्दुल सत्तार यांनी खोतकरांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, अर्जुन खोतकर यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. ३१ तारखेला सिल्लोडच्या विराट सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते आमच्यासोबत येतील. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमची लोकसभा एकच असल्याने दोघांनी एकत्र काम केल्यास राजकीय फायदा होऊ शकतो. अंतिम चर्चा आमच्यात व्हायची आहे. दानवे-खोतकर आणि आम्ही तिघे एकत्र येत पुढची राजकीय वाटचाल कशी असेल त्यावर चर्चा करू. अर्जुन खोतकर आणि आमची जवळीक आहे. कुठेतरी दोन पावलं मागे घेऊन पुढे जाऊ असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठवाड्यात जागावाटप होतील त्यात शिंदे गट-भाजपा एकत्र येत चर्चा करतील. कुणालाही नुकसान नको आणि राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी खबरदारी घेऊ. मराठवाड्यात जे बोटावर मोजण्याइतके नेते आहेत त्यांच्यात अर्जुन खोतकर यांचं नाव आहे. विधानसभा, लोकसभेच्या जागावाटपात प्रामाणिकपणे एकमेकांना सहकार्य लागेल. राजकीय दक्षता घेऊनच काम करणार आहोत असंही सत्तारांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंशी बोलून अंतिम निर्णय घेणारमित्र, भाऊ, सहकारी म्हणून निश्चितपणे मी त्यांच्यासोबत यावं अशी अपेक्षा आहे. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केले आहे. माझ्या मनात जे काही होते ते मी आधीच सांगितले आहे. आज अब्दुल सत्तार आले त्यांच्याशी बोलणं झाले. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून मी अंतिम निर्णय घेईन असं अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे