शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

शिवसेना, आप पक्षाच्या देणग्यांची बेरीज काँग्रेसपेक्षाही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:17 IST

२०१५-१६ व २०१६-१७ या वित्तीय वर्षांमध्ये शिवसेना व आप या प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांची बेरीज केली तर ती राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालेल्या निधीपेक्षाही अधिक भरते.

नवी दिल्ली : २०१५-१६ व २०१६-१७ या वित्तीय वर्षांमध्ये शिवसेना व आप या प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांची बेरीज केली तर ती राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालेल्या निधीपेक्षाही अधिक भरते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांचा ओघ खूपच कमी झाला आहे.२०१६-१७ साली ३१ प्रादेशिक पक्षांना किती देणग्या मिळाल्या यासंदर्भातील अहवाल असोशिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेने गेल्या महिन्यात तर त्याच वित्तीय वर्षात राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा अहवाल एडीआरने चालू वर्षाच्या प्रारंभी प्रसिद्ध केला होता. २००१-०२ या वित्तीय वर्षापासून राजकीय पक्षांना किती देणग्या मिळाल्या याचा तपशील एडीआरने आपल्या वेबसाइटवर दिला आहे. त्यानूसार २००४-०५ व २००८-०९ या कालावधीत म्हणजे यूपीए सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत काँग्रेस व भाजपाला मिळालेल्या देणग्यांची रक्कम जवळपास सारखीच होती. मात्र यूपीए सरकारच्या दुसºया कारकिर्दीत भाजपाला काँग्रेसपेक्षा दुप्पट व मोदी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या तीन वर्षांत भाजपला काँग्रेसपेक्षा पाचपट अधिक देणग्या प्राप्त झाल्या.निवडणुका लढविण्यासाठी व पक्षकार्यासाठी प्रचंड पैसा लागतो. तो खर्च भागविण्यासाठी राजकीय पक्षाला पुरेसा निधी गाठीशी असणे गरजेचे असते. देशभरात जनतेकडून देणग्या गोळा करण्यासाठी ४० दिवसांची जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने नुकताच एका बैठकीत घेतला. देणग्या देण्यासाठी जनतेला आवाहन करण्याची काँग्रेसमध्ये जुनी परंपरा आहे. उद्योगसमुहांकडून मिळणारा निधी आटल्यामुळे हे पाऊल काँग्रेसला पुन्हा उचलावे लागले आहे.>भाजपाला मिळाला ५३२ कोटी रुपयांचा निधी२०१६-१७ या वर्षात भाजपाला ५३२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. काँग्रेसला ४२ कोटी, आप व शिवसेनेला अनुक्रमे २६ व २५ कोटी रुपयांचा, तर शिरोमणी अकाली दलाला १५ कोटींचा निधी मिळाला. आप, शिवसेनेच्या रकमेची बेरीज केली, तर ती ५१ कोटी म्हणजे काँग्रेसला प्राप्त झालेल्या देणग्यांपेक्षाही जास्त होते. २०१४-१५ या वित्तीय वर्षात राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण निधीपैकी काँग्रेसच्या वाट्याला तीस टक्के रक्कम आली होती. मात्र, त्यानंतर हा टक्का घसरतच गेला.

टॅग्स :MONEYपैसाShiv Senaशिवसेना