शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

“शरद पवार संविधानाचे रक्षण करणारे भक्कम नेतृत्व, भाजपने राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:02 IST

Presidential Election 2022: सत्ताधाऱ्यांनी मन मोठे करावे आणि शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

अयोध्या: देशात राष्ट्रपतीपदाच्या (Presidential Election 2022) उमेदवारीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीदेखील पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे मत व्यक्त केले आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर सत्ताधाऱ्यांनी मन मोठे करावे आणि भाजपनेच शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. 

संजय राऊत हे युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अयोध्येला गेले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना आपली प्रतिक्रिया नोंदवली. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते, असे संजय राऊत यांनी नमूद केले. 

शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली पाहिजे

शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली पाहिजे. पण अशी संधी देण्यासाठी राज्यकर्त्यांचे मन मोठे असावे लागते. राज्यकर्त्यांचे मन मोठे असेल तरच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना पाठबळ दिले जाते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत शिवसेनेची भूमिका अद्याप ठरली नाही, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले. तसेच विरोधी पक्षांनी एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यायला हवा. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा सर्वांच्यादृष्टीने स्वीकारार्ह आणि खंबीर असा हवा. असा उमेदवार शोधणे हे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, हे ठरवतील, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली. शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता, आपण या स्पर्धेत नाही असे स्पष्ट केले असल्याचे वृत्त आहे. मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही, असे शरद पवारांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत