“शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच लढतोय”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 09:46 PM2022-06-25T21:46:20+5:302022-06-25T21:47:09+5:30

एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट करत शिवसैनिकांना महाविकास आघाडीची खेळी ओळखण्याचा सल्ला दिला आहे.

shiv sena rebel leader eknath shinde warns shivsainik and said understand this maha vikas aghadi game | “शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच लढतोय”

“शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच लढतोय”

googlenewsNext

गुवाहाटी: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. शिंदे गटासोबत गेलेले आमदार आपण असा निर्णय का घेतला, याबाबत व्हिडिओ तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. दिवसभरातील घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये शिवसैनिकांनो, नीट समजू घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा, असे सांगत भावनिक साद घालत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शनिवार सकाळपासूनच विविध घडामोडी घडताना दिसल्या. राज्यातील विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी हल्ला करत तोडफोड केली. तसेच शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. मात्र, बंडखोर आमदारांवर तूर्तास तरी काही कारवाई न करण्याचे ठरवल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावत सोमवार सायंकाळपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. दिवसभरातील घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट केले आहे. यात त्यांनी शिवसैनिकांना एक प्रेमाचा सल्ला दिला आहे. 

शिवसैनिकांनो! मविआचा खेळ ओळखा

प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित.... आपला एकनाथ संभाजी शिंदे., असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यावेळी #MiShivsainik असा नवा हॅशटॅग दिला आहे.  दुसरीकडे, गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांच्या गटाची एक महत्त्वाची बैठक सायंकाळी पार पडली. यात नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बडोद्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावेळी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते, असा दावा केला जात आहे. मात्र, याला दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर यांनी देशभरातील प्रसारमाध्यमांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत, शिवसैनिकांची आक्रमकता याविषयी सविस्तर भाष्य केले. तसेच आताची परिस्थिती मुंबईत परतण्याची नाही. कायता सुव्यवस्था शांत असल्याशिवाय मुंबईत येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. इथे येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही, असा पुनरुच्चार दीपक केसरकर यांनी केला.
 

Web Title: shiv sena rebel leader eknath shinde warns shivsainik and said understand this maha vikas aghadi game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.