शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

पालघर प्रकरणाचं राजकारण केलंत, पण बुलंदशहरचं करू नका; संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 12:17 IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजपावर अप्रत्यक्ष टीका

मुंबई: पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याची घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची निर्घृणपणे खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरुन ग्रामीण भागात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कारवाई करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बुलंदशहरमध्ये दोन साधूंची रात्री हत्या करण्यात आली. या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून भाष्य केलं. 'अत्यंत निघृण आणि अमानुष! ऊत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी अदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.  

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात होते. सोमवारी रात्री या दोन्ही साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मंदिराच्या आवारातच पडल्याचे दिसून आले. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. 

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनेमागचं कारण अस्पष्ट आहे. ग्रामस्थांनी एका तरुणावर संशय व्यक्त  केला असून पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील पालघर येथेही दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती. लॉकडाऊन नेमका कसा हटणार?; मोदी सरकारकडून 'एक्झिट प्लान'वर काम सुरू३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेतमुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाLynchingलीचिंग