शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

"कोणाचे तळवे चाटून कंगनाला पद्मश्री मिळालाय, ते दिल्लीत सगळ्यांना माहित्येय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 15:29 IST

देशाच्या स्वातंत्र्याला भीक म्हणणाऱ्या, महात्मा गांधींवर टीका करणाऱ्या कंगनावर टीका करताना शिवसेना खासदाराचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालंय, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. गांधींनी कधीही भगतसिंह, नेताजी बोस यांना पाठिंबा दिला नाही. थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही, अशी विधानं केल्यानं कंगना वादात सापडली. कंगनाच्या विधानांचा समाचार घेताना शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महात्मा गांधींना सत्तेची लालसा होती, असं विधान कंगनानं केलं होतं. त्यावर सत्तेची लालसा असती, तर महात्मा गांधी पंतप्रधान, राष्ट्रपती काहीही होऊ शकले असते, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार तुमाने यांनी दिलं. कंगना राणौतला कशामुळे पद्मश्री मिळालाय, कोणाचे तळवे चाटून पुरस्कार मिळालाय, ते दिल्लीत सगळ्या खासदार, आमदारांना माहीत आहे, असं आक्षेपार्ह विधानही त्यांनी केलं. 

महात्मा गांधींबद्दल काय म्हणाली होती कंगना?कंगना राणौतनं इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले. यामध्ये कंगनानं आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली आहे. पहिल्या मेसेजमध्ये कंगना म्हणते की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते, ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचं रक्तही उसळलं नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असं स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले आहे. 

इन्स्टाग्राम स्टोरीजवर दुसऱ्या मेसेजमध्ये कंगना रणौत म्हटलं की, गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिलं नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरं तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचं आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, असं कंगनानं म्हटलं आहे. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतKrupal Tumaneकृपाल तुमानेMahatma Gandhiमहात्मा गांधी