रेल्वे बजेटवर शिवसेना असमाधानी

By Admin | Updated: February 26, 2015 15:38 IST2015-02-26T15:38:29+5:302015-02-26T15:38:29+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मांडलेल्या रेल्वे बजेटवर सत्ताधारी एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने नाराजी दर्शवली.

Shiv Sena dissenting on rail budget | रेल्वे बजेटवर शिवसेना असमाधानी

रेल्वे बजेटवर शिवसेना असमाधानी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मांडलेल्या रेल्वे बजेटवर सत्ताधारी एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने नाराजी दर्शवली. प्रभू यांनी मांडलेले रेल्वे बजेट समाधानकारक नाही अशी टीका शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी बोलून दाखवली.
सुरेश प्रभू यांनी आपल्या रेल्वे बजेटमध्ये विविध प्रोजेक्टची घोषणा केली खरी पण या प्रोजेक्टसाठी पैसा कोठून आणणार आहात असा प्रश्न विचारीत किर्तीकर यांनी रेल्वे बजेट सर्वसामान्यांची निराशा करणारे असल्याचे म्हटले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले सुरेश प्रभू यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले होते. भू- संपादन विधेयकावरुन भाजप व शिवसेनामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता शिवसेनेने रेल्वे बजेटवर नाराजी दर्शवल्याने या दोन्ही पक्षात पूढील काळात आणखी संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेले रेल्वे बजेट हे चांगले आहे पण समजण्यास कठिण आहे असे म्हणत औरंगाबादचे सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी रेल्वे बजेटची खिल्ली उडवली.

Web Title: Shiv Sena dissenting on rail budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.