तांदलवाडी वाळू गटांत यंत्राने साहाय्याने उपसा निवेदन : शिवसेना ग्राहक कक्षाची आयुक्तांकडे तक्रार
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:36+5:302016-02-05T00:33:36+5:30
जळगाव : चोपडा तालुक्यातील तांदलवाडी व जळगाव तालुक्यातील धानोरा येथील वाळू ठेक्यांवर बेकायदेशीर सक्शन पंप, पोकलॅण्ड, जेसीबीचा वापर करून वारेमाप वाळूचे उत्खनन होत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे गुरुवारी केली.

तांदलवाडी वाळू गटांत यंत्राने साहाय्याने उपसा निवेदन : शिवसेना ग्राहक कक्षाची आयुक्तांकडे तक्रार
ज गाव : चोपडा तालुक्यातील तांदलवाडी व जळगाव तालुक्यातील धानोरा येथील वाळू ठेक्यांवर बेकायदेशीर सक्शन पंप, पोकलॅण्ड, जेसीबीचा वापर करून वारेमाप वाळूचे उत्खनन होत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे गुरुवारी केली.महसूल प्रशानातील संपूर्ण अधिकार्यांना भ्रमणध्वनी तसेच व्हॉटस् अप तसेच व्हीडीओ चित्रीकरणाचे पुरावे दिल्यानंतरदेखील कोणतीही कारवाई होत नसल्याचे निवेदन मालपुरे यांनी यावेळी दिले. यावेळी नदीपात्रात वाळू उपशामुळे तयार झालेले खड्डे तसेच अर्थमुव्हर यंत्राच्या साहाय्याने नदी पात्रातील बदललेली दिशा याबाबतचे फोटो त्यांनी निवेदनासोबत सादर केले आहे. संबंधित वाळू ठेकेदारांनी करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याने हे ठेके रद्द करून तत्काळ पर्यावरण कायद्याखाली गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.