शिरूर विषय समित्या सभापतींची निवड बिनविरोध ढोबळे यांची हॅट्ट्रिक : आरोग्य, स्वच्छता सभापतिपदी
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:50+5:302015-02-14T23:51:50+5:30
शिरूर : नगर परिषद विविध विषय समितींच्या सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी निवड जाहीर केली. चांगल्या कामाबद्दल रवींद्र ढोबळे यांना तिसर्यांदा आरोग्य, स्वच्छता विभागाचे सभापतिपदाची संधी देण्यात आली. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत बांधकाम समिती सभापतिपदासाठी अलका नारायण सरोदे; पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समिती सभापतिपदासाठी दादाभाऊ रामदास वाखारे; स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदासाठी रवी ऊर्फ श्याम मनोहर ढोबळे, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शैला भगवान साळवे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पोटे यांनी निवडणूक वेळेनंतर या चार जणांची सभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर पो

शिरूर विषय समित्या सभापतींची निवड बिनविरोध ढोबळे यांची हॅट्ट्रिक : आरोग्य, स्वच्छता सभापतिपदी
श रूर : नगर परिषद विविध विषय समितींच्या सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार रघुनाथ पोटे यांनी निवड जाहीर केली. चांगल्या कामाबद्दल रवींद्र ढोबळे यांना तिसर्यांदा आरोग्य, स्वच्छता विभागाचे सभापतिपदाची संधी देण्यात आली. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत बांधकाम समिती सभापतिपदासाठी अलका नारायण सरोदे; पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समिती सभापतिपदासाठी दादाभाऊ रामदास वाखारे; स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदासाठी रवी ऊर्फ श्याम मनोहर ढोबळे, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शैला भगवान साळवे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पोटे यांनी निवडणूक वेळेनंतर या चार जणांची सभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर पोटे यांच्यासह सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुनीता कालेवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीआधी आघाडी प्रमुख रसिकलाल धारिवाल, अध्यक्ष केशरसिंग परदेशी, सदस्य माऊली पठारे, सभागृहनेते धारिवाल यांच्या बैठकीत उपरोक्त निर्वाचित सभापतींच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. चार वर्षांत प्रत्येकाला संधी मिळेल, या हेतूने निवड करण्यात आली. समिती, सभापती व सदस्य पुढील प्रमाणे : बांधकाम समिती- सभापती- अलका सरोदे, सदस्य- विजय दुगड, जाकिरखान पठाण, अशोक पवार, कविता वाटमारे; पाणीपुरवठा, जलविकास व विद्युत समिती- सभापती- दादाभाऊ वाखारे, सदस्य - अशोक पवार, प्रवीण दसगुडे, महेंद्र मल्लाव, उज्ज्वला बरमेचा; स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती- सभापती, रवी ऊर्फ श्याम ढोबळे; सदस्य- जाकीरखान पठाण, संगीता शेजवळ, अशोक पवार, आबीद शेख; नियोजन विकास गृहनिर्माण, टपरी व झोपडपी पुनर्वसन समिती- सभापती- प्रकाश धारिवाल, सदस्य- विजय दुगड, संतोष भंडारी, महेंद्र मल्लाव, सुवर्णा लटांबळे; महिला व बालकल्याण समिती- सभापती- शैला साळवे, उपसभापती- उज्ज्वला बरमेचा, सदस्य- संगीता शेजवळ, सुवर्णा लटांबळे, कविता वाटमारे; स्थायी समिती - सभापती(पदसिद्ध)- सुनीता कालेवार, सदस्य - प्रकाश धारिवाल, अलका सरोदे, दादाभाऊ वाखारे, रवींद्र ढोबळे, शैला साळवे.फोटो ओळ : नगर परिषद नवनिर्वाचित विषय समित्यांचे सभापतिपदांचे सत्कारप्रसंगी सभागृहनेते धारिवाल, नगराध्यक्षा कालेवार, निवडणूक निर्णय अधिकारी पोटे व इतर.