शिरूरला आडसाली ऊस लागवड नोंदी सुरू

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30

रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यातील व दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांनी आडसाली ऊस लागवड नोंदी धोरण १ जुलै पासून जाहीर केले आहे. कारखान्याच्या गटनिहाय कार्यालयाला शेतकर्‍यांची उसाची नोंद लावण्यासाठी गर्दी होत आहे. कारखान्याकडे ऊस नोंद केल्यामुळे ऊसतोड वेळेवर होत असल्यामुळे नोंद करण्याकडे कल वाढलेला आहे. ऊस हे पीक एकरकमी व भरघोस उत्पादन देणारे पीक असल्यामुळे शेतकरी वर्ग हा ऊस लागवड करण्यासाठी सावडीने (मदतीने) जात आहे. कारण ऊस लागवड या काळात मजूरवर्गाचा तुटवडा जाणवत असतो. मजुरांचा ऊस लागण खर्च एकरी ४ हजार रुपये असल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी वर्गाची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

Shirur started the Sugarcane planting logs for the spots | शिरूरला आडसाली ऊस लागवड नोंदी सुरू

शिरूरला आडसाली ऊस लागवड नोंदी सुरू

ंजणगाव सांडस : शिरूर तालुक्यातील व दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांनी आडसाली ऊस लागवड नोंदी धोरण १ जुलै पासून जाहीर केले आहे. कारखान्याच्या गटनिहाय कार्यालयाला शेतकर्‍यांची उसाची नोंद लावण्यासाठी गर्दी होत आहे. कारखान्याकडे ऊस नोंद केल्यामुळे ऊसतोड वेळेवर होत असल्यामुळे नोंद करण्याकडे कल वाढलेला आहे. ऊस हे पीक एकरकमी व भरघोस उत्पादन देणारे पीक असल्यामुळे शेतकरी वर्ग हा ऊस लागवड करण्यासाठी सावडीने (मदतीने) जात आहे. कारण ऊस लागवड या काळात मजूरवर्गाचा तुटवडा जाणवत असतो. मजुरांचा ऊस लागण खर्च एकरी ४ हजार रुपये असल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी वर्गाची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

फोटो ओळ : सावडीने ऊस लागवड करताना युवा शेतकरी व मजूरवर्ग.

Web Title: Shirur started the Sugarcane planting logs for the spots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.