शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! "लवकर घरी येईन, वाढदिवसासाठी केक आणेन"; 6 वर्षाचा लेक पाहतोय आईची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 12:32 IST

हाफ डे घेऊन घरी लवकर परत येईन आणि मुलाच्या वाढदिवसाचा केकही आणेन असं त्यांनी घरी सांगितलं होतं.

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथे एका परफ्युम फॅक्ट्रीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच चार जण अद्याप बेपत्ता असून, या घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. यामध्ये चंपो देवी यांचाही अद्याप शोध सापडलेला नाही. ज्या दिवशी आग लागली त्यादिवशी चंपो देवी यांच्या मुलाचा वाढदिवस होता. 

हाफ डे घेऊन घरी लवकर परत येईन आणि मुलाच्या वाढदिवसाचा केकही आणेन असं त्यांनी घरी सांगितलं होतं. मात्र त्या अजूनही सापडलेल्या नाहीत. चंपो देवी य़ा बडोह गावच्या रहिवासी आहेत. तिचा नवराही एका फॅक्ट्रीत कामाला होता. चंपो देवी यांना दोन मुलं आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. 

महिलेने आपल्या मुलाला सांगितलं होतं की, ती त्या दिवशी  2 वाजता निघेल. महिलेचा पती दुसऱ्या फार्मा कंपनीत काम करतो. आगीच्या घटनेनंतर पतीने कंपनी आणि रुग्णालयांशी संपर्क साधला, मात्र चंपो देवी यांचा पत्ता लागला नाही. चंपो देवी यांते पती सर्वदयाल यांनी सांगितलं की, आतापर्यंत पत्नीबाबत काहीही सापडलेलं नाही. 

पाचपैकी चार मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. इतर चार मृतांपैकी तीन उत्तर प्रदेशातील आणि एक हरियाणातील पंचकुला येथील असून सर्व महिला आहेत.  भीषण आगीच्या घटनेच्या चौथ्या दिवशी एनडीआरएफची टीम पुन्हा बचावकार्याला सुरुवात करणार आहे. मात्र, फॅक्ट्रीची इमारत असुरक्षित घोषित करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशfireआग