राम मंदिर उभारणीसाठी विहिंप आक्रमक, अयोध्येत मंदिराचे शिलापूजन

By Admin | Updated: December 21, 2015 10:00 IST2015-12-21T09:07:01+5:302015-12-21T10:00:12+5:30

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली असून रविवारी मंदिराचे शिलापूजन झाले.

Shilpujan of the temple in Ayodhya, VHP aggressor for the construction of Ram Temple | राम मंदिर उभारणीसाठी विहिंप आक्रमक, अयोध्येत मंदिराचे शिलापूजन

राम मंदिर उभारणीसाठी विहिंप आक्रमक, अयोध्येत मंदिराचे शिलापूजन

ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. २१ - अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मंदिरासाठी देशभरातून शिला आणण्याचे आवाहन विहिंपने केल्यानंतर रविवारी दोन ट्रक भरून शिला अयोध्येत दाखल झाल्या असून रामजन्म भूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नित्य गोपाल दास यांच्याकडून मंदिराच्या शिला पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. 
सहा महिन्यांपूर्वी विहिंपने हे आवाहन केले होते. त्यानंतर काल दोन ट्रक भरून आलेल्या शिला अयोध्येतील विहिंपच्या मालकीच्या रामसेवक पुरम येथे उतरवण्यात आल्या. राम मंदिर उभारणीची "वेळ‘ आल्याचे सूतोवाच केंद्र सरकारने केल्याचा दावा गोपाल दास यांनी केला. 
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस सतर्क झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले
 
 

 

Web Title: Shilpujan of the temple in Ayodhya, VHP aggressor for the construction of Ram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.