२०१४ च्या निवडणुकीत सर्वोत्तम कामगिरीकरिता सायबराबाद आयुक्तांना पुरस्कार
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:32+5:302015-01-22T00:07:32+5:30
हैदराबाद-२०१४ च्या निवडणुकीत खर्चावर देखरेख करणे व पैशाचा अपव्यय टाळण्याकरिता केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल निवडणूक आयोगाने सायबराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांना राष्ट्रीय विशेष गुणवत्ता पुरस्कार घोषित केला आहे.

२०१४ च्या निवडणुकीत सर्वोत्तम कामगिरीकरिता सायबराबाद आयुक्तांना पुरस्कार
ह दराबाद-२०१४ च्या निवडणुकीत खर्चावर देखरेख करणे व पैशाचा अपव्यय टाळण्याकरिता केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल निवडणूक आयोगाने सायबराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांना राष्ट्रीय विशेष गुणवत्ता पुरस्कार घोषित केला आहे.भारतातील ४५० हून अधिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी राबविलेल्या उपायांची देशव्यापी तपासणी केल्यानंतर आयोगाने ही घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतातील दोन उमेदवारांची राष्ट्रीय सामान्य श्रेणी पुरस्कार व राष्ट्रीय विशेष श्रेणी पुरस्काराकरिता निवड केली आहे. राष्ट्रीय विशेष श्रेणी पुरस्काराचे स्वरुप ५० हजार रुपये, एक मानपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे. हा पुरस्कार आनंद यांना नवी दिल्लीतील विज्ञान भवनात २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.