मेंढपाळ परतले संगमनेर : स
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30
माधानकारक पाऊस न पडल्याने निर्माण झालेल्या दूष्काळात चारा व पाण्यासाठी मेंढपाळ गावांकडे परतू लागले आहेत. साकूर व वनकुटे परिसरातील मेंढपाळ दरवर्षी जून्नर, आंबेगाव, खेड, मूरबाड भागात जातात. मात्र यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने दूष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्यामूळे पिण्याचे पाणी व चार्यासाठी मेंढपाळ आपापली मेंढरं घेवून गावाकडे परतू लागले आहेत.

मेंढपाळ परतले संगमनेर : स
म धानकारक पाऊस न पडल्याने निर्माण झालेल्या दूष्काळात चारा व पाण्यासाठी मेंढपाळ गावांकडे परतू लागले आहेत. साकूर व वनकुटे परिसरातील मेंढपाळ दरवर्षी जून्नर, आंबेगाव, खेड, मूरबाड भागात जातात. मात्र यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने दूष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्यामूळे पिण्याचे पाणी व चार्यासाठी मेंढपाळ आपापली मेंढरं घेवून गावाकडे परतू लागले आहेत. खरीप पिके वायाबोटा : पावसाअभावी पठार भागातील घारगाव व बोटा परिसरात खरीप पिके वाया गेली आहेत. याचा सर्वाधीक फटका लाल कांद्यास बसला आहे. यावर्षी बाजरी, भुईमूग, कांद्याच्या ५० टक्के पेरण्या झाल्या. परंतू गेल्या तीन महीन्यात पाऊसच न पडल्याने ही पिके वाया गेली आहेत. नांदूर खंदरमाळ, पोखरी बाळेश्वर, डोळासणे भागात लाल कांद्याला मोठा फटका बसल्याने श्ेतकरी हवालदिल झाले आहेत. अवेळी बसमूळे हालबोटा : अहमदनगर-कोतूळ ही मुक्कामी एस.टी. बस अवेळी येत नसल्याने प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहेत. पारनेर आगाराची ही बस काही दिवसांपासून अनियमीत वेळेत धावत असल्याने आळेफाटा, बोटा, ब्राह्मणवाडा, कोतूळ या भागातील प्रवश्यांचे हाल होत आहे. त्यामूळे सदर बस नियमीत वेळेत सोडण्याची मागणी होत आहे. एलआयसी वर्धापनदिन संगमनेर : एल.आय.सी.चा ५९ वा वर्धापनदिन मेजर लक्ष्मण ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. निवृत्त कर्मचारी सखाहारी माळी व दिलीप कोकणे यांनी शुभेच्छा दिल्या. शाखाधिकारी किशेर अतकरणे व विकास अधिकारी सुर्यकांत गुंडाळ यांनी नवीन सेवेची माहीती दिली. सूत्रसंचालन मनिषा देशमुख यांनी करून विश्वजीत आगवेकर यांनी आभार मानले.