शेजा-यांचे नापाक इरादे यशस्वी होणार नाहीत - राजनाथ सिंह
By Admin | Updated: July 21, 2016 15:24 IST2016-07-21T15:20:44+5:302016-07-21T15:24:57+5:30
आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला.

शेजा-यांचे नापाक इरादे यशस्वी होणार नाहीत - राजनाथ सिंह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - काश्मीरमधल्या हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार आहे. आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला. भारतात दहशतवाद असेल तर तो पाकिस्तानमुळे आहे.
पाकिस्तान भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. धर्माच्या नावाखाली काश्मीरमधील परिस्थिती बिघडवण्याचे कारस्थान आपला शेजारी रचत आहे असा आरोप राजनाथ यांनी केला. ते लोकसभेत काश्मीर मुद्यावरील चर्चेच्यावेळी बोलत होते. काश्मीर खो-यातील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहे असे राजनाथ म्हणाले.
धर्माच्या नावाखाली ते भारतापासून वेगळे झाले पण आज दहशतवादामुळे ते दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. दर दिवशी त्यांची लढाई सुरु आहे. आपल्या शेजा-यांचे नापाक इरादे कधीही यशस्वी होणार नाहीत असे राजनाथ म्हणाले.