शेजा:यांचा मदतीचा हात
By Admin | Updated: October 14, 2014 01:57 IST2014-10-14T01:57:53+5:302014-10-14T01:57:53+5:30
हुडहुड वादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशात आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी शेजारी राज्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

शेजा:यांचा मदतीचा हात
>विशाखापट्टणम/भुवनेश्वर : हुडहुड वादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशात आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी शेजारी राज्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. केंद्र सरकारखेरीज कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनी तातडीने देऊ केलेल्या मदतीमुळे वादळग्रस्त राज्यांना दिलासा मिळाला आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वन यांनी आंध्रला पाच कोटी मदत घोषित केली असून, 5 हजार विजेचे खांब, 1क् हजार इन्सुलेटर्स, 1क्क् ट्रान्सफॉमर्स व अन्य उपकरणो देऊ केले असूना रस्ते स्वच्छ करण्यासाठी अधिका:यांचे एक पथकही रवाना केले आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या आंध्रला मदत करण्यासाठी कर्नाटक सरकारने आपला हात पुढे केला असून, आंध्रातील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारने तंत्रज्ञांसह मनुष्यबळ देऊ केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्याकडे आंध्रचे मुख्यमंत्री नायडू यांनी चर्चा केली असून, आंध्रातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याकरिता कर्नाटकाने ही मदत देण्याचे मान्य केले आहे.
सोमवारी पावसाचा जोर कमी झाला तेव्हा विशाखापट्टणममधील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला . मात्र गेल्या दोन दिवसांपासून या भागात वीज पुरवठा व पाणीपुरवठा खंडित झाल्याने तसेच पेट्रोलपंप बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. भाजीपाला व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा कमी असल्याने त्याच्या भावात अचानक मोठी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कमी होताच नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या. विद्युत पुरवठा बंद असल्याने नागरिकांना चक्रीवादळाशी संबंधित बातम्यांकरिता रेडिओची मदत घ्यावी लागली. वेगाने वाहणा:या वा:यामुळे विमानतळ व रेल्वेला मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने या नुकसानीचा अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकसानीचा अंदाज घेण्यास सांगितले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी, अडीच लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याचे सांगितले. या वादळाने घरांचे व विद्युत यंत्रणोचे मोठे नुकसान केल्याचे ते पुढे म्हणाले. राज्यातील वादळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पुनवर्सनाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देऊन त्यांनी हे काम लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
एका प्राथमिक पाहणीत ओडिशातील 25 हजारांहून अधिक कच्ची घरे कोसळली आहेत. या राज्यातील बंसाधरा, रुसिकुल्या व नागबली या नद्यांच्या जलस्तरात वाढ झाली असली तरी पूरस्थिती उद्भवलेली नाही. आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राजमुंदरी व विशाखापट्टणम येथील निवारा शिबिरांची पाहणी केली तसेच वादळग्रस्त भागाचे हवाई निरीक्षण केले. आंध्र सरकारने निवारा शिबिरांमधील व्यवस्था पाहण्यासाठी पाच पथके नियुक्त केली आहेत. तर अग्निशमन विभागाची 3क् पथके रस्ते मोकळे करण्याच्या कामी धाडण्यात आली आहेत. शिबिरातील नागरिकांकरिता पाच लाखांहून अधिक भोजनाची पाकिटे तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या व्यतिरिक्त चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशातील नागरिकांना प्रत्येकी 25 किलो तांदूळ व पाच लिटर रॉकेल देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या चक्रीवादळाचा जोर कमी झाला असला तरी, आंध्र व ओडिशाच्या काही भागात येत्या 24 तासात 6.5 ते 12.4 सें.मीपर्यंत पाऊस कोसळण्याची शकयता वर्तविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
मुख्यमंत्र्यांसोबत राजनाथसिंह यांची चर्चा
4गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बिहार, झारखंड, प. बंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी चक्रीवादळाच्या संदर्भात बोलणी केली.
4या वादळाने निर्माण केलेल्या कोणत्याही परिस्थिीवर मात करण्यासाठी केंद्र पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
4हैदराबाद-दक्षिण मध्य रेल्वेने चक्रीवादळापायी चार रेल्वेगाडय़ा रद्द केल्या असून तीन रेल्वे गाडय़ांच्या मार्गात बदल केला आहे.
4तिरुपती-पुरी एक्स्प्रेस, मुंबई-भुवनेश्वर एक्सप्रेस व निजामुद्दीन-विशाखापट्टणम लिंक एक्स्प्रेस व मुंबई-विशाखापट्टणम या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच विजयवाडा-विशाखापट्टणम आणि राजमुंदरी-विशाखापट्टणम या गाडय़ाही रद्द केल्या आहेत.
याखेरीज हैदराबाद-हावडा ईस्ट कोस्ट एक्सप्रेसचा मार्ग बदलून तो बल्लारशाह-नागपूर-रायपूर असा करण्यात आला आहे. याचसोबत नगरकोयल-शालीमार एक्सप्रेस आणि मुंबई-भुवनेश्वर एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.