शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 17:07 IST

शहीद जवानांच्या मदतीसाठी सरसावल्या जिल्हाधिकारी इनायत खान

शेखपुरा: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करा, अशी भावना संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत असताना दुसऱ्या बाजूला हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. बिहारमधील एक जिल्हाधिकारी राज्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांची जबाबदार स्वीकारणार आहेत. बिहारच्या शेखपूरच्या जिल्हाधिकारी इनायत खान यांनी जिल्ह्यातील एका शहीद कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. राज्यातील दोन जवान गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. या दोन्ही कुटुंबांच्या मदतीसाठी बँक खाती उघडण्याचे आदेश इनायत खान यांनी दिले. या कुटुंबांच्या सहाय्यासाठी जमा झालेला निधी या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. 10 मार्चपर्यंत जितका मदत निधी जमा होईल, त्याचे दोन समान भाग करुन ते दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील, अशी माहिती खान यांनी दिली. मी दोनपैकी एका कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाटनाच्या रारगढ गावचे संजय कुमार सिन्हा आणि भागलपूरच्या रतनपूर गावचे रतन कुमार ठाकूर यांनी पुलवामातील हल्ल्यात हौतात्म्य पत्करलं. गुरुवारी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. आदिल अहमद दार या दहशतवादी तरुणानं स्फोटकांनी भरलेल्या कारसह एका बसला धडक दिली. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत जाहीर केली. याशिवाय सर्वसामान्य जनताही शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली. क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकार यांच्यासह अनेक क्षेत्रांमधली व्यक्तींनीदेखील शहीदांच्या कुटुंबीयांना सढळ हातांनी मदत केली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदBiharबिहारTerror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद