शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'शहजाद'नं काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या अफरातफरीचा केला खुलासा- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 16:39 IST

सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या  प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या  प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुजरातमधल्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान ते बोलत होते. मोदी म्हणाले, ज्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत स्वतंत्रता नाही, ते पक्षाच्या लोकांसाठी कसं काम करू शकतील. मी तरुण नेते शहजाद पूनावालांना सांगू इच्छितो की, तुम्ही फारच हिमतीचं काम केलं आहे.परंतु दुर्दैवानं काँग्रेसमध्ये नेहमीच असं होत असतं. शहजाद यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणा-या अफरातफरीचा भांडाफोड केला आहे. शहजाद पूनावाला हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेसनं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांना पक्षाच्या सोशल मीडिया ग्रुपमधूनही काढून टाकण्यात आलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव राहिलेल्या शहजाद पूनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींच्या निवड प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित करत हे इलेक्शन नव्हे, तर सिलेक्शन आहे, असं म्हटलं होतं.विशेष म्हणजे शहजाद पूनावाला यांनी थेट राहुल गांधींना पत्र लिहून हे प्रश्न उपस्थित केले होते. तसेच शहजाद आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांची एक ऑडियो टेपही व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये मनीष तिवारी म्हणाले होते, तुम्ही असे प्रश्न विचारण्याआधी विचार करायला हवा होता, कारण काँग्रेस ही एक खासगी संपत्ती आहे. त्यानंतर शहजाद पूनावाला यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत झालेली गोष्ट फक्त सांगितली. मला राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्यात कोणतीही समस्या नाही, परंतु मी फक्त अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मी नेहमीच काँग्रेससाठी लढत आलो आहे. वंशवादामुळे पक्षाला पुन्हा पुन्हा पराभवाचा सामना करावा लागतो आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधी