शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 10:40 IST

जम्मू काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, या शब्दांत कौतुक करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता ४० दिवस झाले आहे. युद्ध न थांबवण्याची भूमिका इस्रायलने घेतली आहे. भारताने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझापट्टीत सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा संदर्भत घेत, भारतातील काश्मीर हे गाझा बनले नाही, याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, असे स्पष्ट मत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनी व्यक्त केले आहे. 

काश्मीरचे गाझा बनले नाही. काश्मीरमध्ये जे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, परिवर्तन झाले आहे, हे केंद्रातील मोदी सरकारमुळे झाले आहे, अशी स्तुतिसुमने शेहला रशीद यांनी उधळली आहेत. यापूर्वी शेहला रशीद यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, हे सत्य आहे. पण हे माझे मत २०१० पूर्वीचे होते. आता ते मत बदलले आहे. आजच्या घडीला काश्मीरमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याबाबत मोदी सरकारचे आभार मानायला हवेत, असे शेहला रशीद यांनी म्हटले आहे. 

काश्मीरमधील स्थिती बदलली आहे

काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. काश्‍मीर फक्त विरोधी आंदोलने, निषेध मोर्चे होत असल्याचे पाहायला मिळत होते. दहशतवाद, घुसखोरीच्या घटनांसाठी काश्मीर ओळखले जायचे. मात्र, काश्मीरमधील स्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीचे श्रेय सध्याच्या केंद्र सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देऊ इच्छिते, या शब्दांत शेहला रशीद यांनी कौतुक केले आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारची धोरणे आणि नीति यांवर शेहला रशीद यांनी यापूर्वी जोरदार टीका केली होती. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच भारतीय सैन्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र, यानंतर आता शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारची कौतुक केले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह