शीतल महाजन
By Admin | Updated: January 26, 2016 00:04 IST2016-01-26T00:04:44+5:302016-01-26T00:04:44+5:30
शीतल महाजन

शीतल महाजन
श तल महाजनमूळची जळगाव येथील रहिवासी असलेल्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती असलेल्या शीतल महाजन यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शीतल महाजन यांनी १४ एप्रिल २००४ रोजी कोणताही पूर्वानुभव नसताना तीन हजार फुटावरून उणे ३७ डिग्री तापमानात पॅराशूटच्या साहाय्याने उत्तर ध्रुवावर उडी मारली होती. त्यानंतर १७ डिसेंबर २००६ मध्ये फ्री फॉल व त्यानंतर पॅराशूटच्या साहाय्याने दक्षिण ध्रुवावर उडी मारली होती. अशी उडी मारणारी ती जगातील पहिली महिला ठरली होती. क्रीडा व साहस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे केंद्र शासनाने शीतल महाजन यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.