शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शीशमहाल विरूद्ध राजवाडा! विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत भाजप अन् आप समोरासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:38 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला ‘शीशमहाल’ म्हणण्यावरून भाजप आणि आप आमनेसामने आले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला ‘शीशमहाल’ म्हणण्यावरून भाजप आणि आप आमनेसामने आले. याबाबत बुधवारी दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरले होते.

आपचे खासदार संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज पत्रकारांना सोबत घेत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात जाण्यासाठी निघाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सोन्याचे टॉयलेट, जलतरण तलाव, मिनी बार असल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत. त्यामुळे आम्ही ते आहे की नाही, हे दाखविण्यासाठी आलो असल्याचे संजय सिंह म्हणाले. यावेळी सिंह व सौरभ भारद्वाज यांना बुधवारी पोलिसांनी वाटेतच रोखले. 

संजय सिंह यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला २७०० कोटी रुपयांचा राजवाडा म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडले. यानंतर सिंह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले. यानंतर दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा हे दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या बंगल्याबाहेर पोहोचले. ते म्हणाले की, आतिशी यांच्याकडे दोन बंगले आहेत. ‘बंगलेवाल्या देवीला’ अजून किती बंगले हवे आहेत?

काँग्रेसनेही घेतली वादात उडी

भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही शीशमहाल वादात उडी घेतली. काँग्रेस नेते गुरुदीप सिंग सप्पल म्हणाले की, काँग्रेस पक्षाने ५५ वर्षे सत्ता चालविली  आहे. गांधी परिवाराने आपले आनंद भवन देशाला दान केले होते.

इंडिया आघाडी फुटली

दिल्ली निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडी फुटली असून, आपला ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी केजरीवाल निवडणुका जिंकणार असा संभ्रम जनतेत पसरवत आहेत. या विधानाला केजरीवाल यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भाजप आणि काँग्रेसची छुपी युती उघड झाली आहे.

२५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत : काँग्रेस

  • दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी ‘जीवन रक्षा योजना’ जाहीर केली. याअंतर्गत सत्तेत आल्यास दिल्लीतील जनतेला २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्याचे आश्वासन दिले आहे.
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची ही दुसरी ‘हमी’ आहे. यापूर्वी, त्यांनी ‘प्यारी दीदी योजना’ जाहीर केली असून, यात दिल्लीतील पात्र महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. आपनेही महिलांसाठी आश्वासन दिले आहे.

२६ वर्षांनंतर भाजप सत्तेत येणार?

  • भाजप २६ वर्षांहून अधिक काळानंतर दिल्लीत सत्तेत येण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.
  • अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपवर भ्रष्टाचाराच्या आरोप करत आपल्या ‘परिवर्तन’ घोषणेवर भाजप लक्ष केंद्रित करत आहे.
  • भाजप २ डिसेंबर १९९३ आणि तीन डिसेंबर १९९८ दरम्यान दिल्लीत सत्तेत होती.
  • त्यावेळी दिल्लीत भाजपचे तीन मुख्यमंत्री झाले. यात मदन लाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांचा समावेश आहे.
टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप