शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या परिचित व्यक्ती सीबीआयच्या रडावर

By Admin | Updated: October 21, 2015 16:52 IST2015-10-21T16:52:00+5:302015-10-21T16:52:00+5:30

नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने इंद्राणी मुखर्जी हिच्या एका परिचिताच्या भूमिकेचाही तपास सुरू केलेला आहे. इंद्राणीची ही परिचित व्यक्ती कधीकाळी तिच्या पतीसाठी काम करीत होती.

Sheena Bora massacre: Indrani's acquaintance with CBI's cry | शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या परिचित व्यक्ती सीबीआयच्या रडावर

शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या परिचित व्यक्ती सीबीआयच्या रडावर

ी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने इंद्राणी मुखर्जी हिच्या एका परिचिताच्या भूमिकेचाही तपास सुरू केलेला आहे. इंद्राणीची ही परिचित व्यक्ती कधीकाळी तिच्या पतीसाठी काम करीत होती.
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीची परिचित असलेली ही व्यक्ती कोलकाता येथे राहणारी आहे आणि ती इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यांचा कर्मचारी म्हणून काम करीत होती. सीबीआयने त्याच्या घराची नुकतीच झडती घेतली होती.
मुंबई पोलिसांच्या तपासादरम्यान ही व्यक्ती पुढे आली नव्हती. परंतु सीबीआयच्या तपासात तिचे नाव समोर आल्यानंतर आता शीनाच्या हत्येमागच्या हेतूचा तपास करण्यात मदत होईल, अशी आशा आहे. या व्यक्तीमुळे तपासालाही नवी दिशा मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sheena Bora massacre: Indrani's acquaintance with CBI's cry