छेडछाड करणा-याला तिने पायातील चप्पल काढून चोपले

By Admin | Updated: June 12, 2017 10:11 IST2017-06-12T10:11:40+5:302017-06-12T10:11:40+5:30

गुरगाव येथील पबमध्ये काम करणा-या एका महिलेने तिचा विनयभंग करणा-या पुरुषाला बेदम चोप दिला.

She stabbed the sandal of the foot and pulled off the slippers | छेडछाड करणा-याला तिने पायातील चप्पल काढून चोपले

छेडछाड करणा-याला तिने पायातील चप्पल काढून चोपले

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 12 - गुरगाव येथील पबमध्ये काम करणा-या एका महिलेने तिचा विनयभंग करणा-या पुरुषाला बेदम चोप दिला. शनिवारी रात्री गुरगावच्या एमजी रोडवर ही घटना घडली. महिला पब जवळ उभी असताना नशेमध्ये तर्र असलेला एक इसम पाठिमागून आला व त्याने महिलेला पकडले.  अचानक घडलेल्या या प्रकाराने सुरुवातीला महिला भांबावून गेली. 
 
त्यावेळी तिथे असणारे सहकारी या महिलेच्या मदतीला धावले. त्यांनी महिलेची सुटका केली. या महिलेने नंतर पायातील चप्पल काढून खुलेआम छेडछाड करणा-या या इसमाला बेदम चोप दिला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
 
ही घटना घडली त्यावेळी आसपास एकही पोलीसवाला नव्हता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी आम्ही साध्या वेशात पुरुष आणि महिला पोलिसांना तैनात केले आहे. पीडित व्यक्ती आली तर, एफआयआर नोंदवण्याच्या आम्ही आदेश दिले आहेत अशी माहिती गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनीश सेहगल यांनी दिली. 
 

Web Title: She stabbed the sandal of the foot and pulled off the slippers