‘ती’ पाकिस्तानी मुले मायदेशी परतणार

By Admin | Updated: September 24, 2015 09:13 IST2015-09-23T22:19:51+5:302015-09-24T09:13:04+5:30

हरवलेल्या गुरांच्या शोधात अवैधरीत्या भारतीय हद्दीत शिरलेल्या तीन पाकिस्तानी मुलांची मायदेशी रवानगी होऊ शकते.

'She' Pakistani children will return home | ‘ती’ पाकिस्तानी मुले मायदेशी परतणार

‘ती’ पाकिस्तानी मुले मायदेशी परतणार

जैसलमेर : हरवलेल्या गुरांच्या शोधात अवैधरीत्या भारतीय हद्दीत शिरलेल्या तीन पाकिस्तानी मुलांची मायदेशी रवानगी होऊ शकते.
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक बी.आर. मेघवाल यांनी बुधवारी ही माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी ही तीन मुले आपल्या हरवलेल्या गुरांना शोधत शोधत भारतीय हद्दीत शिरली होती. जैसलमेर जिल्ह्याच्या किशनगडला लागून असलेल्या सीमेनजीक भारतीय जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते. १२ ते १४ वयोगटातील या मुलांची नावे सलीम, साजन व सावल अशी आहेत. त्यांच्या चौकशीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने आज-उद्या त्यांची मायदेशी रवानगी होण्याची शक्यता आहे. पाक रेजर्सला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ध्वज बैठक होऊन त्यांना मायदेशी पाठवले जाईल, असे मेघवाल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: 'She' Pakistani children will return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.