ती बेपत्ता महिला पोलिसांसमोर हजर

By Admin | Updated: December 29, 2014 04:16 IST2014-12-29T04:16:24+5:302014-12-29T04:16:24+5:30

आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी आणि गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेली महिला रविवारी अचानक सुरत पोलिसांसमोर हजर झाली.

She appeared before the disappeared women police | ती बेपत्ता महिला पोलिसांसमोर हजर

ती बेपत्ता महिला पोलिसांसमोर हजर

इंदूर/सुरत : आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी आणि गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेली महिला रविवारी अचानक सुरत पोलिसांसमोर हजर झाली.
ही महिला सुरतमधून बेपत्ता झाल्यानंतर इंदूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सुरत पोलिसांचे एक पथक सकाळी येथे पोहोचले. दरम्यान, ही महिला सुरत पोलीस ठाण्यात आली असल्याची माहिती त्यांना मिळाली. इंदूरचे पोलीस अधीक्षक (पूर्व) ओ.पी. त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. पीडिता इंदूरमध्ये नसल्याचे त्यांनी शनिवारीच सांगितले होते.
दुसरीकडे सुरतचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रदील सेजूल यांनी तक्रारकर्ती महिला स्वत:च पोलीस ठाण्यात आल्याचे स्पष्ट केले. सदर महिलेने आसारामबापूंविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदविली होती. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आपण कायदेशीर कामासाठी अहमदाबादेत गेलो होतो, असे या महिलेने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: She appeared before the disappeared women police