सायकलसह शॉलचा गठ्ठाही चोरला
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:25+5:302015-02-10T00:56:25+5:30
लकडगंज : काश्मीरच्या तरुणावर उपासमारीची वेळ

सायकलसह शॉलचा गठ्ठाही चोरला
ल डगंज : काश्मीरच्या तरुणावर उपासमारीची वेळनागपूर : रोजीरोटीसाठी नागपुरात आलेल्या एका काश्मिरी तरुणाची सायकल आणि त्यावर लादलेला शॉलचा गठ्ठा चोरट्याने नेल्यामुळे या तरुणावर उपासमारीची वेळ आली आहे. अरशिद मोहम्मद रमजान भट (वय २८) असे पीडित तरुणाचे नाव आहे. तो मूळचा अनंतनाग (काश्मीर) जिल्ह्यातील नंबलगाव येथील रहिवासी आहे. रोजीरोटीसाठी काही महिन्यांपूर्वी तो नागपुरात आला. सायकलवर शॉलचा गठ्ठा लादून दिवसभर तो शहरात फिरतो आणि शॉल विकतो. ५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता तो अशाच प्रकारे शॉलचा गठ्ठा असलेली सायकल घेऊन निघाला. नयापुरा प्रेमनगरातील सुमेंद्र शहा यांच्या घरासमोर सायकल उभी करून तो घरात गेला. ५ ते १० मिनिटातच परत आला तेव्हा त्याची सायकल तेथे नव्हती. ५५ हजारांच्या शॉलचा गठ्ठा लादलेली सायकल चोरट्याने चोरून नेली होती. इकडे-तिकडे शोध घेऊनही चोरट्याची माहिती न मिळाल्यामुळे अरशिदने लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.----