भाजपात राहणार की नाही हे काळच ठरवेल - शत्रुघ्न सिन्हा

By Admin | Updated: July 26, 2015 16:01 IST2015-07-26T16:01:59+5:302015-07-26T16:01:59+5:30

नितीश कुमार हे बिहारचे विकास पुरुष अशा शब्दात भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमार यांची स्तुती केली आहे.

Shatrughan Sinha will decide whether the BJP will remain or not | भाजपात राहणार की नाही हे काळच ठरवेल - शत्रुघ्न सिन्हा

भाजपात राहणार की नाही हे काळच ठरवेल - शत्रुघ्न सिन्हा

 

ऑनलाइन लोकमत 
पाटणा, दि. २६ - नितीश कुमार हे बिहारचे विकास पुरुष अशा शब्दात भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमार यांची स्तुती केली आहे. सध्या तरी भाजपा सोडण्याचा विचार नसला तरी याच पक्षात राहणार की नाही हे काळच ठरवेल असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
बॉलीवूडमधील शॉटगन अर्थात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या नितीश कुमार यांच्यासोबत 'चाय पे चर्चा' केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार दौ-यात जदयू व नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली असतानाच शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीश कुमारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या जदयूत जाण्याचा कोणतागी इरादा नाही, पण भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. भाजपासोबत एक मिशन म्हणून जोडलो गेलो असून मी पक्षाच्या प्रतिमेला कधीच धक्का लागू दिला नाही अशी आठवणही त्यांनी करुन दिली. पक्ष बदलायचा किंवा पक्षातून काढला जाईन हे येणारा काळच सांगेल, पण सध्या तरी मी पक्षाचा आदर करतो असेही त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Shatrughan Sinha will decide whether the BJP will remain or not