शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

शशिकला नकोच होत्या, जयललितांचा व्हिडीओ मंत्र्याने केला जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 4:07 AM

तामिळनाडूच्या सत्ताधारी अण्णा द्रमुकमधील अंतर्गत भांडणे मिटता मिटण्याची शक्यता दिसत नसून, मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी मंत्रिमंडळातील महसूलमंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दोन व्हिडीओ जारी केले असून

चेन्नई : तामिळनाडूच्या सत्ताधारी अण्णा द्रमुकमधील अंतर्गत भांडणे मिटता मिटण्याची शक्यता दिसत नसून, मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी मंत्रिमंडळातील महसूलमंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दोन व्हिडीओ जारी केले असून, त्यात राज्याच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या शशिकला कुटुंबावर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.अम्मांचा आत्मा अशा कृत्यांना माफ करील का? ही कृत्ये म्हणजे अम्मांचा विश्वासघात नाही का, असेही उदयकुमार यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, जयललितांच्या मृत्यूनंतर शशिकलांना पक्ष सरचिटणीस करण्याची मागणी उदयकुमार यांनीच सर्वप्रथम केली होती. त्यानंतर, काही काळाने ते पलानीस्वामी यांच्या समर्थनासाठी उभे राहिले.डिसेंबर २०११ मधील हा व्हिडीओ असल्याचे सांगताना, उदयकुमार म्हणाले की, ज्यांना जयललितांनी पक्षाबाहेर हाकलले होते, तेच आता जयललितांच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकत आहेत. दिनकरन यांनी पक्षात नव्याने नियुक्त्या करण्याचा, तसेच हकालपट्टी करण्याचा धडाका लावलाआहे, त्यावरही उदयकुमार यांनी टीका केली. या व्हिडीओमध्ये जयललिता म्हणतात, ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. एवढे होऊनही ते पक्षातील नेते, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवतात व सांगतात की, ते एक ना एक दिवस पक्षात परततील. त्यानंतर, त्यांचा मोठा प्रभाव असेल. एवढेच नाही, तर जे नेते-कार्यकर्ते त्यांचे ऐकतील व त्याप्रमाणे वागतील, त्यांनाही माफी नाही.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू