शशी थरूर यांची दुसऱ्यांदा चौकशी
By Admin | Updated: February 12, 2015 23:17 IST2015-02-12T23:17:24+5:302015-02-12T23:17:24+5:30
: सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची गुरुवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी केली़

शशी थरूर यांची दुसऱ्यांदा चौकशी
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची गुरुवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी केली़ थरूर यांना गेल्या चार आठवड्यांत दुसऱ्यांदा एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे़ सुनंदा यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाशी निगडित विविध बिंदूंवर तसेच आयपीएल वादाशी संबंधित अनेक प्रश्न थरूर यांना यावेळी विचारण्यात आल्याचे कळते़
दिवसभरात दोन टप्प्यांत सुमारे साडेचार तास थरूर यांची चौकशी झाली़ दुपारच्या टप्प्यात थरूर आणि त्यांचा वाहनचालक बजरंगी यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली़ थरूर सर्वप्रथम सरोजिनीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले़ येथून सकाळी ११.३० वाजता त्यांना वाहन चोरीविरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आले़ येथे पाच अधिकाऱ्यांनी थरूर यांची चौकशी केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)