शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार

By Admin | Updated: January 21, 2015 01:31 IST2015-01-21T01:31:23+5:302015-01-21T01:31:23+5:30

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकवार चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.

Shashi Tharoor will be questioned again | शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार

शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकवार चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.
याआधी झालेल्या चौकशीदरम्यान थरुर यांनी पोलिसांना सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांचा उद्देश सत्यापर्यंत पोहचणे हा असून त्यासाठी या प्रकरणाशी जुळलेल्या प्रत्येक पैलूचा विचार केला जाईल असेही ते म्हणाले. त्यांना पुन्हा एकदोन दिवसात चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
एक दिवस आधी झालेल्या चौकशीत थरुर यांच्याकडे आम्ही त्यांच्या पार्श्वभूमीबाबत चौकशी केली. तसेच त्या दिवशी काय झाले याबाबत विचारणा केली.
प्रसिद्धी माध्यमात जे वृत्त प्रसिद्ध झाले त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले होते व त्याबाबत आम्ही त्यांच्याकडे माहिती मागितली असे बस्सी यांनी सांगितले. थरुर यांच्याकडे सोमवारी रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली. थरुर यांच्यासोबत स्पष्टवक्तेपणाने विचारणा करण्यात आली.
घटना घडली त्या दिवशी नेमके काय झाले याचा आम्ही शोध घेत आहोत. मात्र आताच त्याचा निष्कर्ष सांगता येणार नाही असे बस्सी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Shashi Tharoor will be questioned again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.