शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

माकड आलं अन् थेट शशी थरूर यांच्या मांडीवर जाऊन बसलं, मग काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 17:47 IST

Shashi Tharoor Viral News : शशी शरुर यांची पोस्‍ट निसर्ग आणि प्राण्यांचा आदर करण्याची आठवण करून देणारी ठरली आहे. 

Shashi Tharoor Viral News : काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांची त्यांच्या बागेत एका माकडाशी अनोखी भेट झाली. ही घटना बुधवारी (दि.४) घडली. शशी थरूर यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली. तसेच फोटोही शेअर केले आहेत. शशी शरुर यांची पोस्‍ट निसर्ग आणि प्राण्यांचा आदर करण्याची आठवण करून देणारी ठरली आहे. 

शशी थरुर यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, आज एक विलक्षण अनुभव आला. सकाळी बागेत बसून नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाचत बसलो होतो. अचानक माझ्‍या बागेत एक माकड आले. ते थेट माझ्‍या मांडीवर येऊन बसले. त्‍याला दिलेली दोन केळी सुद्धा त्‍याने अत्‍यंत शांतपणे खाल्‍ली. मग त्याने मला मिठी मारली आणि माझ्या छातीवर ते डोके ठेवून झोपले.

सुरुवातीला मला माकड चावण्याची भीती वाटत होती. यामुळे रेबीजचे इंजेक्शन द्यावे लागेल, अशी थोडी काळजी वाटत होती. मात्र, मी शांत राहिलो. वन्यजीवांबद्दलचा आदर आपल्यात खोलवर रुजलेला आहे. आपली डुलकी पूर्ण झाल्यावर माकडाने उडी मारली आणि पळ काढला, असे शशी थरुर यांनी आपल्या पोस्‍टमध्‍ये म्हटले आहे.

पुढे शशी थरुर म्हणाले की, मला आनंद आहे की, माझा विश्वास खरा ठरला आणि आमची बैठक पूर्णपणे शांत आणि सौम्य झाली. ही घटना आपल्याला शिकवते की, आपण नेहमीच निसर्ग आणि त्यातील प्राण्यांचा आदर केला पाहिजे. दरम्यान, अशाप्रकारे काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शशी थरुर यांनी स्वत:ला आलेला माकड भेटीचा थोडा वेगळा अनुभव शेअर केला आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरMonkeyमाकडSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया