शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शशी थरुर यांचे ट्विट, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 19:00 IST

काँग्रेस नेते शशी शरुर यांनी किशोर कुमार यांच्या गाण्यातील बोल ट्विट करुन टीका करणाऱ्यांना सुनावले. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...

नवी दिल्ली - हिंदू-पाकिस्तानवरील टिपण्णीमुळे अनेकांच्या टीकेचे धनी बनलेले काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचेच पुन्हा एकदा सूचवले आहे. शरुर यांनी किशोर कुमार यांच्या गाण्यातील बोल ट्विट करुन टीका करणाऱ्यांना सुनावले. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना... असे ट्विट थरुर यांनी केले आहे. थरुर यांनी या ट्विटमध्ये गाण्याच्या दोन लाईनसह एक व्हिडिओही शेअर केला आहे. 

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी गुरुवारी एक विधान केले होते. या विधानवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. आगामी निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यास ते संविधान बदलतील आणि भारताला हिंदू पाकिस्तानमध्ये बदलून टाकतील, असे विधान थरुर यांनी केले होते. तसेच भाजपसह संघ परिवारावरही थरुर यांनी टीका केली होती. संविधान बदलासाठी भाजप सरकारला राज्यसभेतही बहुमताची गरज आहे. त्यादृष्टीने भाजपसह संघ परिवाराचे प्रयत्न सुरू असल्याचे थरुर यांनी म्हटले होते. दरम्यान, शरुर यांच्या या विधानावरुन भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसला निर्लज्ज असे संबोधले. तसेच काँग्रेसकडून नेहमीच हिंदूंना बदनाम करण्यात येत असून हिंदूंचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नसल्याचे पात्रा यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस