शशी थरूर दोन दिवसांत तिसऱ्यांदा एसआयटीपुढे
By Admin | Updated: February 14, 2015 00:45 IST2015-02-14T00:45:31+5:302015-02-14T00:45:31+5:30
सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे आज शुक्रवारी दोन दिवसांत तिस-यांदा विशेष तपास पथकापुढे(एसआयटी) हजर झाले़

शशी थरूर दोन दिवसांत तिसऱ्यांदा एसआयटीपुढे
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे आज शुक्रवारी दोन दिवसांत तिस-यांदा विशेष तपास पथकापुढे(एसआयटी) हजर झाले़
थिरुवनंतपूरमला परतणार असल्याची माहिती एसआयटीला देण्यासाठी दुपारी १ च्या सुमारास थरूर सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात पोहोचले़ याठिकाणी ते सुमारे अर्धा तास होते़ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अर्ध्या तासात एसआयटीने थरूर यांना औपचारिक प्रश्न विचारले नाहीत़ मात्र काल गुरुवारच्या चौकशीत थरूर यांनी दिलेल्या माहितीसंदर्भातील काही पूरक प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आले़ एसआयटीने थरूर यांना ठावठिकाणा कळविण्यास व संपर्कात राहण्यास सांगितले़ तूर्तास त्यांच्या प्रवासावर कुठल्याही मर्यादा घातल्या नाही़ (लोकमत न्यूज नेटवर्क)