भाजपा प्रवेशाबाबत शशी थरूर यांनी सोडलं मौन
By Admin | Updated: April 10, 2017 21:34 IST2017-04-10T21:34:56+5:302017-04-10T21:34:56+5:30
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील खासदार शशी थरुर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या.

भाजपा प्रवेशाबाबत शशी थरूर यांनी सोडलं मौन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील खासदार शशी थरुर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश कऱणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. केरळमधील कम्यूनिस्ट पक्षाचे सचिव के. बालकृष्णन यांनी राज्यातील काँग्रेसचे चार ज्येष्ठ नेते भाजपात जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तेव्हापासून थरुर हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा होती. अखेर भाजपा प्रवेशाबाबत थरूर यांनी मौन सोडलं आहे.
भाजपामध्ये प्रवेश करणार नसल्याचं थरूर यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपात जाणार असल्याचे वृत्त निराधार आहे, गेल्या चार दशकांपासून मी उदारमतवादी भारताचे समर्थन केले आहे. माझी विचारसरणी बाजपासोबत जुळत नाही , सर्व नागरिक आणि समाजाला समान अधिकार मिळावे या मताचा मी आहे. त्यासाठी मी 40 वर्षांपासून आवाज उठवतोय. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी माझ्या विचारधारेबद्दल ठाम आहे आणि मी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या केवळ अफवा आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाहीये असं ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी थरुर यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता, तेव्हाही थरूर भाजपात जाणार असल्याचं बोललं जात होतं.