शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

‘त्या’ वक्तव्यावरुन शशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:23 IST

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.

ठळक मुद्देशशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान मोदींची माफीटीका केल्यानंतर चूक झाल्याचे आले लक्षातपंतप्रधान मोदींच्या त्या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर गेले आहेत. कोरोना संकटाच्या काळातील पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे. ढाक्याजवळ असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, तेव्हा अटक होऊन तुरुंगवासही भोगला होता, असे म्हटले.  यावर काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी टीका केली होती. मोदी बांगलादेशलाही फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत, अशी टीका थरूर यांनी केली होती. परंतु, आपली चूक झाली आहे, हे लक्षात येताच लगेच कबुली देत पंतप्रधान मोदींची माफी मागितली आहे. (congress shashi tharoor admitted mistake over pm narendra modi bangladesh satyagraha statement)

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते. यावेळी मला अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता, अशी आठवण पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना सांगितली. यावर, “आंतरराष्ट्रीय शिक्षण... आपले पंतप्रधान बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की, बांगलादेशला कुणी स्वातंत्र मिळवून दिलं,” असे ट्विट करत शशी थरूर यांनी टीका केली होती. 

चूक झाल्याचे लक्षात येताच प्रांजळ कबुली

काँग्रेस नेते शशी थरूर यांना ट्विट केल्यानंतर टीका करताना चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॉरी म्हणत, माझी चूक असेल, तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे मथळे आणि ट्विट वाचून ट्विट केलं होतं. ‘बांगलादेशला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलंय हे सगळ्यांना माहिती आहे,’ असं मी म्हणालो होतो. नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्यांनी त्याचा उल्लेख केला… सॉरी, असे लगेच दुसरे ट्विट शशी थरूर यांनी केले आहे. 

‘‘भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला?’’

सत्याग्रह करण्याची काय गरज होती?

सन १९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेने केलेल्या विरोधाचा सामना करूनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती: पंतप्रधान मोदी

दरम्यान, पूर्व सीमेबाबत भारत निश्चिंत आहे. कारण भारतासोबत बांगलादेश उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कोरोनासारख्या वैश्विक महामारीशी लढण्यासाठी मदत मिळाली, असे कौतुकोद्गार बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यादरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच विरोधी पक्षनेत्यांशीही पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली.

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश