शरीफांच्या आडून दबावतंत्र!

By Admin | Updated: May 26, 2014 03:05 IST2014-05-26T03:05:24+5:302014-05-26T03:05:24+5:30

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या उद्याच्या शपथविधीमध्ये शिवसेनेतर्फे अनंत गीते यांचा समावेश कॅबिनेट मंत्री म्हणून केला जाणार आहे.

Sharif's strong pressure! | शरीफांच्या आडून दबावतंत्र!

शरीफांच्या आडून दबावतंत्र!

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या उद्याच्या शपथविधीमध्ये शिवसेनेतर्फे अनंत गीते यांचा समावेश कॅबिनेट मंत्री म्हणून केला जाणार आहे. शिवसेनेचे ते तूर्त एकमेव मंत्री असतील. सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेला उद्याच्या शपथविधीमध्ये जादा हिस्सा हवा होता पण मोदी यांनी त्यास नकार दिला. किमान एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद उद्याच्या शपथविधीमध्ये द्यावे, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. तसे केल्यास चार महिन्यांनी राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चांगला मॅसेज जाईल, असेही समर्थन देण्यात आले. तथापि, विस्तारामध्ये शिवसेनेला आणखी स्थान दिले जाईल, असे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे उद्याच्या शपथविधी समारंभाला हजर राहणार असल्याने शिवसेना त्यावर बहिष्कार टाकेल, असे म्हटले जात होते. तथापि, आज सायंकाळपर्यंत ताणून नंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समारंभाला हजर राहणार असल्याची भूमिका घेतली. हीच भूमिका खरेतर शिवसेनेला कालही जाहीर करता आली असती पण त्यांनी भाजपावर दबाव आणला, असे म्हटले जाते. शरीफ भेटीच्या आड दबाव आणून सत्तेतील आपला वाटा वाढवून घेण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपाकडून अपेक्षित दाद मिळाली नाही, असे आता म्हटले जात आहे. उद्या शपथ घेण्याची शक्यता असलेले अनंत गीते यापूर्वीही एनडीए सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. ते रायगडचे खासदार आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Sharif's strong pressure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.