शारदा घोटाळा : सुदीप्तो सेनच्या सहकाऱ्याला अटक

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:01+5:302015-02-13T23:11:01+5:30

कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदीप्तो सेन याचा जवळचा सहकारी प्रशांतो नासकर याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली.

Sharda scandal: Sudipto Sen's colleague arrested | शारदा घोटाळा : सुदीप्तो सेनच्या सहकाऱ्याला अटक

शारदा घोटाळा : सुदीप्तो सेनच्या सहकाऱ्याला अटक

लकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदीप्तो सेन याचा जवळचा सहकारी प्रशांतो नासकर याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली.
ईडीने शारदा घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी ४० वर्षीय नासकर याला आधी आपल्या सॉल्ट लेक कार्यालयात बोलावून घेतले आणि काही तासपर्यंत चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. नासकर हा बिष्णुपूर विभागात शारदा योजनेचा एजंट म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत होता. या भागात राजकीय नेता म्हणूनही त्याचा दबदबा आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याशी तसेच सेन याच्याशी त्याची जवळीक आहे.
बिष्णुपूर भागात नासकर याच्या मालकीची मोठ्या प्रमाणावर चल आणि अचल संपत्ती आहे. गुंतवणूकदारांना जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून तो पैसे गोळा करीत होता. शारदा घोटाळाप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केल्यापासून ईडीने केलेली ही पाचवी अटक आहे. शारदा घोटाळ्याचा सीबीआयतर्फेही तपास सुरू आहे. याआधी ईडीने सुदीप्तोची पत्नी पियाली आणि पुत्र सुभोजित यांना अटक केली होती. नासकर याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Sharda scandal: Sudipto Sen's colleague arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.