‘आधीच्या तपासाने शारदा घोटाळ्याचा गुंता वाढला’
By Admin | Updated: September 19, 2014 01:33 IST2014-09-19T01:33:01+5:302014-09-19T01:33:01+5:30
विविध तपास संस्थांनी आधी केलेल्या तपासामुळे शारदा घोटाळ्याची संपूर्ण तपास प्रक्रिया अधिक जटिल होऊन बसली असून यातील गुंता अधिक वाढला आहे,

‘आधीच्या तपासाने शारदा घोटाळ्याचा गुंता वाढला’
कोलकाता : विविध तपास संस्थांनी आधी केलेल्या तपासामुळे शारदा घोटाळ्याची संपूर्ण तपास प्रक्रिया अधिक जटिल होऊन बसली असून यातील गुंता अधिक वाढला आहे, असे सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेचे मत आह़े सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावर तीन महिन्यांपूर्वी सीबीआयने या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीची सूत्रे आपल्या हाती घेतली होती़
सूत्रने सांगितले की, आम्ही तीन महिन्यांपूर्वी या घोटाळ्याचा तपास सुरू केला; पण बंगाल सरकारद्वारा गठित विशेष तपास दल आणि राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाने या प्रकरणातील गुंता वाढवला आह़े अशा स्थितीत तपासाचे धागे एकमेकांना जोडणो आमच्यासाठी कठीण झाले आह़े