गाईची शेपूट पकडून भाजपाला सत्तेत यायचंय - शरद यादव
By Admin | Updated: November 5, 2015 13:57 IST2015-11-05T13:51:14+5:302015-11-05T13:57:13+5:30
गाईची शेपूट पकडून भाजपाला सत्तेत यायचंय अशी खरमरीत टीका जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी केली आहे.

गाईची शेपूट पकडून भाजपाला सत्तेत यायचंय - शरद यादव
ऑनलाइन लोकमत
सहरसा (बिहार), दि. ५ - गाईची शेपूट पकडून भाजपाला सत्तेत यायचंय अशी खरमरीत टीका जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी केली आहे. बिहारमध्ये महाआघाडीचीच सत्ता येणार असा दावाही त्यांनी केला आहे.
बिहारमधील पाचव्या व अंतिम टप्प्यात शरद यादव यांनीही मतदान केले. मधेपूरामधील मतदान केंद्रावरुन बाहेर पडल्यावर शरद यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये जेवढ्या सभा घेतल्या त्याचा फायदा महाआघाडीलाच मिळाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. भाजपाने बिहारवासीयांना पाकिस्तानी म्हणून संबोधित करत बिहारचा अपमान केला आहे. या अपमानाचा बदला जनता महाआघाडीच्या पारड्यात मत टाकून घेत आहे असेही त्यांनी नमूद केले. भाजपाने साहित्य, कला, शिक्षण, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा अवमान केल्यानेच ही मंडळी पुरस्कार परत करत आहे असा आरोपही यादव यांनी केला.