शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची महाविकास आघाडी इतर राज्यांत जाण्यास उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 04:55 IST

बिहारातील नितीशकुमारांचा जदयू आणि रामविलास पासवान यांचा लोजपा, तसेच महाराष्ट्रातील रामदास आठवले यांचा रिपाइं यांच्याशी पहिल्यांदा संपर्क करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विजयाने उत्साहित झालेली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी इतर राज्यांतही जाणार असल्याचे वृत्त आहे. एनडीएविरोधातील आघाडीला देशव्यापी स्वरूप देण्यात येईल, असे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच म्हटले आहे. मात्र, केवळ एनडीएविरोधातीलच नव्हे, तर एनडीएमधील असंतुष्ट पक्षांनाही आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, बिहारातील नितीशकुमारांचा जदयू आणि रामविलास पासवान यांचा लोजपा, तसेच महाराष्ट्रातील रामदास आठवले यांचा रिपाइं यांच्याशी पहिल्यांदा संपर्क करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. या पक्षांसोबतच्या बैठकीत सकारात्मक परिणाम येऊ शकतो, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटतो. फडणवीस यांनी रात्रीतून शपथ घेतली तेव्हा जदयूने नाराजी व्यक्त केली होती, हे आघाडीच्या नेत्यांच्या विश्वासामागील प्रमुख कारण आहे. रामदास आठवलेही सरकार स्थापनेच्या काळात सातत्याने शिवसेनेच्या संपर्कात होते. ते भाजपसाठी प्रयत्न करीत होते,तरीही बहुमत ज्याच्याकडे आहे, त्याचेच सरकार बनावे, असे मत त्यांनी शिवसेना नेत्यांजवळ बोलून दाखविले होते. त्यामुळे आठवले यांनाही आज ना उद्या आघाडीत आणता येईल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते.याशिवाय उत्तर प्रदेशातील सरकारचा सहयोगी पक्ष अपना दल यासह बसपा, सपा आणि लोकदल आपल्यासोबत येऊ शकतात, असे आघाडीला वाटते. शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यास हे पक्ष सोबत येऊ शकतात, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी केंद्राच्या विरोधात आघाडीत येऊ शकतात, असेही नेत्यांना वाटते.ही केवळ सत्याची सोबतजदयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रात बहुमताला डावलण्यात आले तेव्हा आम्ही सत्य बोलण्याचे काम केले. हा विरोध एनडीए अथवा फडणवीस सरकारला नव्हता. ही केवळ सत्याची सोबत होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना शरद पवार पूर्वीपासून जाणतात. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर विचार होऊ शकतो. मात्र, त्यापुढील रणनीती नितीशकुमार हेच ठरवतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार